आज रोजी भुसावल तालूका एथेलेटिक्स एसोसिएशन, भुसावळचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा, माननीय वस्त्र उद्योग मंत्री श्री संजय भाऊ सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला.
यात दोन जिवन गौरव पुरस्कार श्री इंद्रसिग गुलाबसिग पाटील व श्री गजानन टंकाधर यांना देण्यात आला. उत्कृष्ट क्रिडा प्रशिक्षकाचा पुरस्कार श्री पुर्वेश प्रमोद सोनवणे यांना देण्यात आला.
उत्कृष्ट खेळाडू चा पुरस्कार कुमारी गौरी कृष्णा लोहार, कुमारी सुजल महेंद्र शुक्ल व कुमार प्रसाद सदाशिव सोनावणे यांनी देण्यात आला, तर विशेष योगदान पुरस्कार श्री गुड्डू कुमार व दिया पटेल यांना देण्यात आला.
या वेळी प्रोत्साहन पर पंधरा ते विस कनिष्ठ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तर कु. जोसेफ डँनियल पवार या खेळाडू ला महाजन इ-बाईक्स तर्फे विशेष पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून श्रीमती रजनी ताई सावकारे, श्री संदीप भाऊ सुरवाडे, श्री किरण भाऊ कोलते, श्री राहूल भाऊ तायडे, माजी नगरसेवक श्री पवन बुंदेले, श्री जयंत माहूरकर, आदी मान्यवर उपस्थित होते. श्री राहूल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री रमण भोळे सरांनी केले.
पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या पालकांची उपस्थिती लक्षवेधी होती.यावेळी भुसावळ तालुका एँथेलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री चन्द्रकांत निकम साहेब जी, व सचिव श्री रविन्द्र चोपडे सर जी, कार्यकारी सचिव श्री गोपी सिंह राजपूत जी कोषाध्यक्ष श्री उदय महाजन , श्री किरण पाटिल, श्रीमती ममता जांगिड, श्री डोंगरसिंग महाजन, श्री सत्यवान बिंद्रा श्री योगेन्द्र हरणे, श्री सरोज कुमार, श्री सुरेंद्र पाटिल, श्री डेनियल पवार जी,, आदी भुसावल तालूका एथेलेटिक्स एसोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते।

Leave a Reply