अनुलोमच्या माध्यमातून नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिनावल तालुका रावेर येथे गुरुवंदना उपक्रम संपन्न

गुरु पौर्णिमेच्या निमित्त चिनावल येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिनावल येथे महंत प.पु.श्री. लक्ष्मण दास जी महाराज रामायणाचार्य अयोध्या धाम यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना गुरु व शिष्य यांच्या प्रेमळ नात्यातील बारकावे समजून सांगितले

मार्गदर्शनानंतर शाळेतील मुख्याध्यापक एच.आर.ठाकरे यांनी महंत व अनुलोमचे आभार मानले संस्थेचे सुनील महाजन व खेमचंद्र पाटील यांनी संस्थेच्या वतीने महंतांचा स्वागत व सत्कार केला संस्थेतील सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

महंतांच्या मार्गदर्शनानंतर 800 विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापल्या वर्ग शिक्षकांच्या व आलेल्या महंतांची चरण वंदना केली या उपक्रमासाठी अनुलोमचे उपविभाग जनसेवक दिनेश चव्हाण,अनुलोमचे भाग जनसेवक नथ्थू धांडे, अनुलोमचे मित्र निलेश नेमाडे ,शुभम सरोदे , जितेंद्र वानखेडे यांनी परिश्रम घेतले

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *