महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेचा सर्वोच्च उत्सव – आषाढी वारी नुकताच भावपूर्ण वातावरणात पार पडला. या वारीच्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीष महाजन यांच्या पुढाकारातून “आनंदाची वारी” या उपक्रमांतर्गत श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेची मोफत सोय करण्यात आली आहे.
या यात्रेसाठी विशेष रेल्वे ची व्यवस्था करण्यात आली असून शनिवार, दि. १९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता जामनेरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वांना जमुन भुसावळ रेल्वे स्थानकासाठी रवाना व्हायचे आहे. यानंतर जामनेर तालुक्यातील वारकऱ्यांसाठी भुसावळ येथुन खास आरक्षित रेल्वेने पंढरपूरकडे प्रयाण होणार आहे.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. “वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा” ही धारणा बाळगून सरकारने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत हा विशेष उपक्रम राबवला आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.

Leave a Reply