जगन्नाथ नगर नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करा -शिशिर जावळे : अंजाळे गावाच्या नामकरण मुद्दा शासन दरबारी प्रलंबित

खानदेशातील यावल तालुक्यातील अंजाळे येथील थोर संत वैकुंठवासी परमपूज्य जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांचे सन्मानार्थ अंजाळे तालुका यावल या गावाचे जगन्नाथ नगर नामकरण करण्याची मागणी भाजपाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव तथा लेवा समाज हितवादी चळवळीचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी शासनाकडे केलेली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खान्देशामध्ये वारकरी सांप्रदायाचा प्रचार आणि प्रसाराची परंपरा अखंड अविरतपणे आपल्या हजारो कीर्तन सेवेच्या माध्यमातून व वारीच्या माध्यमातून कायम ठेवणारे व वारकऱ्यांमध्ये विठ्ठल भक्ती जागृत करणारे वयाच्या चौदाव्या वर्षापासून आजन्म पायी वारी करणारे… यावल तालुक्यातील अंजाळे या गावातील थोर संत वैकुंठवासी खानदेश भूषण हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज अंजाळेकर हे निस्वार्थ संत होऊन गेले. त्यांचा शिष्य परिवार खान्देशासह मराठवाडा महाराष्ट्र व भारतात सर्वत्र मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे.

या थोर संताचं निस्वार्थ कार्य बघून त्यांना 2008 मध्ये भुसावळ शहरात भव्य अशा कार्यक्रमात खानदेश भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले होते. त्यांना अध्यात्मिक क्षेत्रातील विविध कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळालेले होते. त्यानंतर च्या कालावधीमध्ये महाराजांचा आदर सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याची महती संपूर्ण महाराष्ट्रासह विविध प्रांतात व्हावी म्हणून काही वर्षांपूर्वी वारकरी संप्रदायाच्या भक्तांच्या विशेष मागणी नुसार अंजाळे तालुका यावल येथील ग्रामपंचायतीने.

अंजाळे या गावाचे जगन्नाथ नगर असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर करून शासनाकडे सादर केला होता. मात्र शासन दरबारी असलेली उदासीनतेमुळे आज पर्यंत सुद्धा या गावाचं नामकरण करण्यात आलेलं नाही तो प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडलेला आहे आणि म्हणून अशा या थोर संताच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी पुन्हा एकदा शासन दरबारी प्रलंबित धूळखात असलेला हा नामकारणाचा चा प्रस्ताव त्वरित मंजूर करून यावल तालुक्यातील अंजाळे गावाचे जगन्नाथ नगर असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा लेवाहितवादी चळवळीचे प्रमुख प्रवर्तक शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह , जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सहशासनाकडे मागणी केली असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविलेले आहे

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *