21 मार्च जागतिक वनदिनाच्या निमित्ताने वनसंवर्धन करूया, पर्यावरणाचा समतोल राखूया, पृथ्वीला वाचवूया . पर्यावरण तज्ञ डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

दिनांक 21 मार्च 2025 जागतिक वनदिवस हा दिवस म्हणजे पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने पूर्व सूचना असून वने जंगल ही आपणास म्हणजे पृथ्वीवरील सर्व सजीवांना निसर्गाकडून मिळालेली अनमोल देणगी आहे. प्राणी, पशु पक्षी यांचं आश्रयस्थान म्हणजे घनदाट जंगल ती आपली नैसर्गिक संपत्ती आहे तिला जतन करण्याचा हा संकल्प दिवस आहे. दरवर्षी वेगवेगळ्या थीम द्वारे 21 मार्चपासून त्यात थीमचा प्रसार वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे करण्यात येतो. 21 मार्च 2025 याची थीम ॔॔॔॔ वने आणि अन्न ॓ अशी आहे. असे डॉ.सुरेंद्र सिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र यांनी सर्वांना पोषण व उपजीविकेसाठी जंगलाचे महत्व व त्याचे पर्यावरणासाठी योगदान किती महत्त्वाचे आहे. त्याचा प्रसार करण्यात येतो. वने हे पृथ्वीवरचा आधारस्तंभ आहे आपण घेत असलेले ऑक्सिजन हवा, पिण्याचे पाणी, अन्न ,औषध निवारा या मूलभूत गरजा सर्व जंगलाची निगडित आहेत जंगले मातीची सुपीकता राखण्यास जलश्रोताचे संरक्षण करण्यास जैवविविधतेला पाठिंबा देण्यास मदत करत असता जंगले फळे काजू औषधी वनस्पती वन्य वनस्पती पृथ्वीवरील सर्व सजीवांना आवश्यक असलेले अन्नश्रोत निर्माण करण्याचे काम करत असतात अलीकडे असा अहवाल आला आहे की अमेरिकेतून आणलेल्या फुलझाडं घाणेरी ओ साडी जंजिरे टाकळा तीकोमा कॉसमॉस रानमारी हे दिसण्यास सुंदर असलेले मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्यामुळे आपले स्थानिक प्रजातींचे झाडं झुडपं वेलवर्गीय वनस्पती यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे तसेच गवताच्या प्रजाती उपयुक्त व पर्यावरण पूरक वनस्पतींचा नाश होत आहे त्यामुळे प्राण्यांची उपासमार होत आहे. जंगली प्राणी पशुपक्षी जंगल नष्ट झाल्याने पाण्याची उपलब्धता नसल्याने तेथील प्राणी शेतामध्ये शेतांची नासधूस करत असतात तसेच गावातही येत असतात प्रत्येकाने पर्यावरण जतन राहण्याच्या दृष्टीने आजच्या पिढीने विदेशी झाडे लावू नये स्वदेशी व पर्यावरण पूरक झाडे लावावे जंगलतोड थांबवण्याचा संकल्प करावा तसेच आजच्या पिढीला जंगलाचे महत्त्व व संवर्धन करणे किती गरजेचे आहे हे 21 मार्च जागतिक वन दिन पासून पुढे वेबिनार ,कार्यशाळा यांचे आयोजन करून पर्यावरण समतोल राखण्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. याची माहिती द्यावी. पृथ्वीवरील सर्व सजीवांचे एकमेकांकरता राहणे पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक आहे आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *