आज भुसावळ तालुका अॅथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने भुसावळ रेल्वे विभागाचे सुरक्षा आयुक्त तसेच नव्याने नियुक्त क्रीडा अधिकारी श्री. चित्रेश जोशी सर यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.या भेटीत विविध क्रीडा विषयक बाबींवर मोलाची चर्चा झाली.
या प्रसंगी श्री. रमन भोळे सर यांनी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख श्री. जोशी सरांना करून दिली.
यावेळी क्रीडा, तरुणांचे प्रशिक्षण, आणि तालुक्यातील अॅथलेटिक्स विकासाबाबत विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
कार्यक्रमास अध्यक्ष श्री. चंद्रकांत निकम साहेब, सचिव श्री. रवींद्र चोपडे सर, श्री. गोपीसिंग राजपूत, श्री. योगेंद्र हरणे, श्री. गुडू कुमार, श्री. डॅनियल पवार, श्री. सतीश चौधरी तसेच इतर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply