भुसावळ तालुका अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजनभुसावळ तालुका अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. २० जुलै २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता पार पडणार आहे.
हा सोहळा वस्त्रोद्योग मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. संजयजी वामन सावकारे यांच्या सुरभी नगर, भुसावळ येथील संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून श्री. संजयजी वामन सावकारे उपस्थित राहणार आहे.
या सोहळ्यात भुसावळ तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे. खेळ आणि खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी आयोजित या कार्यक्रमाबाबत क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.

Leave a Reply