छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश.. भुसावळ भाजपाने केला जल्लोष

महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांसह तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे. या ऐतिहासिक निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

सदर बातमी मिळताच भुसावळमध्ये भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास भाजपाचे राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी “जय भवानी जय शिवाजी” आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमास भाजपाचे अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजपा राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी, जिल्हा सरचिटणीस परिक्षीत बऱ्हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, पिंटू कोठारी, निळकंठ भारंबे, प्रवीण इखणकर, ललित मराठे, पुरुषोत्तम नारखेडे, ॲड. बोधराज चौधरी, राजेंद्र आवटे, अजय नागराणी, देवेंद्र वाणी, नितीन धांडे, अनिरुद्ध कुलकर्णी, सागर चौधरी, राहुल तायडे, चेतन बोरोले, शैलेंद्र ठाकरे, रवी ढगे, शंकर शेळके, राजू खरारे, प्रशांत पाटील, गौरव वाघ, चेतन जैन, प्रेमचंद तायडे, गोपी राजपूत, योगेंद्र हरणे, सचिन बऱ्हाटे, दिनेश राणे, पंकज कोलते, बॉबी डॅनियल, गोलू चौधरी, खिलेश महाजन आदींसह भाजपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *