शेंदुर्णी – आषाढी एकादशीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) शेंदुर्णी व मेडिव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रति पंढरपूर” शेंदुर्णी येथे चार ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात ६८ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी मोठ्या श्रद्धेने आणि सेवाभावाने आलेल्या वारकऱ्यांची व भाविकांची मोफत आरोग्य तपासणी केली व आवश्यक मार्गदर्शन दिले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रेमचंद पंडित (वैद्यकीय अधीक्षक, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय), श्री. नितीन झाल्टे (व्यवस्थापन परिषद सदस्य, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ), श्री. सिद्धेश्वर लटपटे (प्रांत संघटन मंत्री, देवगिरी प्रांत), डॉ. श्रावणी अवरगंड (राष्ट्रीय कार्यकारी सदस्य, अभाविप), श्री. ललित सोनार (प्रांत सहसंयोजक, मेडिव्हिजन), तसेच श्री. गणेश जाधव (शहर मंत्री, शेंदुर्णी) यांच्या उपस्थितीत पार पडला.
शिबिरात रक्तदाब, साखर तपासणी, जनरल चेकअप यासारख्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
अभाविप व मेडिव्हिजन यांच्यातर्फे सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवा तेथे देवसेवा या भावनेने हे शिबिर भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले.


Leave a Reply