एन.के. नारखेडे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता १ ली चा विद्यार्थी तीर्थराज मंगेश पाटील याने नॅशनल स्केटिंग रेस स्पर्धेत रिले मॅच व स्केटिंग रेस मध्ये अंडर ६ गटात दुसरा क्रमांक मिळवला. त्याला १ सिल्वर व १ ब्रांज मेडल मिळाले. याचबरोबर, त्याची निवड २०२५ मध्ये थायलंडमध्ये होणाऱ्या रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेसाठी झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. मकरंद नारखेडे, मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे यांनी त्याचे कौतुक केले आणि पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply