भुसावळ – आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वारकऱ्यांसाठी एक आनंददायक बातमी आहे. रावेर लोकसभा मतदारसंघासह जळगाव व बुलडाणा जिल्ह्यातील भाविकांसाठी भुसावळहून पंढरपूरकडे मोफत विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येत आहे.
या विशेष ‘अनारक्षित’ रेल्वे गाडीची व्यवस्था केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पुढाकाराने करण्यात आली असून, गाडीतील सर्व तिकिटांचा खर्चही त्यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
ही विशेष गाडी दि. ५ जुलै २०२५ रोजी भुसावळ येथून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना होणार असून, दि. ६ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास परतीचा प्रवास सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि आपल्या पंढरपूर वारीचा प्रवास सुखकर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply