भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर वसाहत येथे 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन आर्ट ऑफ लिविंग शिक्षक श्री. अशोक धांडे व श्री. कुणाल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. संतोषजी वकारे, प्रभारी मुख्य अभियंता प्रकल्प यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक श्री. जाधव, कल्याण अधिकारी श्री. वासुदेव, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचारी, अभियंते, अधिकारी, संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक अभियंता, श्री. खुरपे, यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य अभियंता, औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ श्री. मोराळे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply