वासुदेव जेष्ठ नागरिक संघात संगीत संध्या उत्साहात

आयुष्य हे जबाबदारी पार पाडण्यात खर्ची झाले,आता निवृत्त जीवन जगतांना आपल्या सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करावे असे प्रतिपादन प्रमोद बोरोले यांनी आज वासुदेव जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत केले.

रिंग रोड येथील योग केंद्रात वासुदेव जेष्ठ नागरिक संघाची मासिक सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रकाश पाटील,धनराज पाटील, भानुदास पाटील, आदी उपस्थित होते.पुढे प्रमोद बोरोले म्हणाले की,वासुदेव जेष्ठ नागरिक संघाने आज आपल्याला आपले कलाकौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.ही एक आपल्या सुवर्ण संधी आहे.

संगीत संध्याला प्रभाकर झांबरे यांनी शंख ध्वनी करून कार्यक्रमास सुरुवात केली.यानंतर पी.जी. पाटील यांनी भगवद्गीतेतील अध्याय 15 पुरुषोत्तम योग म्हणून झाल्यावर गणेश सरोदे यांनी भजन तर भास्कर खाचणे गवळण सादर केली.प्रभाकर झांबरे मनोगत व हास्ययोग तर आर.एल.चौधरी यांनी आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या विविध मुद्रा करून दाखवल्या.प्रमोद बोरोले यांनी भजन सोबत ज्ञानेश्वर पाटील यांनी भक्ती गीत म्हंटले. असे विविध कलाकौशल्य सादर करण्यात आले.संजय चौधरी यांनी आभार मानले.विश्व कल्याण साधनारी प्रार्थना होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.यावेळी विश्वनाथ वाणी,सुरेश बुलाखी बेलसरे,पुंजू भारंबे ,दिनकर शंकर पाटील, रमण भोगे,प्रमोद बोरोले,आर एल चौधरी, लोटू फिरके,इंदुबाई सपकाळे, खुशाल महाजन, पंडित पाटील ,अशोक ढाके,टीव्ही पाटील ,सौ वैशाली पाटील,यशवंत वारके,सौ यमुनाबाई वारके, श्रीमती रजनी राणे, सोपान नेमाडे,खाचणे सर ,गणेश सरोदे,ज्ञानदेव पाटील,दिलीप चौधरी,दिलीप मराठे, पांडुरंग पाटील, श्रीमती विजया भारंबे,श्रीमती प्रमिला धांडे आदी उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *