भुसावळ : शहरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सहभाग घेतला.जामनेर रोडवरील बियाणी मिलिटरी स्कूलपासून सुरू झालेल्या या रॅलीचा समारोप यावल रोडवरील गांधी पुतळ्याजवळ करण्यात आला. रॅलीदरम्यान देशभक्तीपर गीते, घोषणांनी शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा धारण करून देशप्रेमाचे संदेश दिले. या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना वाढीस लागल्याचे पाहायला मिळाले.



Leave a Reply