येथील एकमेव प्रमुख क्रीडा मैदान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (जुने डी.एस. ग्राउंड) वर आनंद मेळा भरवण्यास विरोध करत क्रीडाप्रेमींनी मुख्याधिकारी यांच्याकडे सविनय निवेदन सादर केले. यामध्ये त्यांनी मैदानाचा वापर केवळ क्रिडा आणि व्यायाम यासाठीच व्हावा, अशी मागणी केली आहे.
निवेदनात असे नमूद करण्यात आले की, सदर मैदानावर महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक दररोज क्रिकेट, रनिंग, व्यायाम आणि स्पर्धा परीक्षेचा सराव करणारे युवक सराव करतात. मात्र, न.पा. प्रशासनाने 2 मे ते 31 मे 2025 या कालावधीसाठी आनंद मेळ्यास परवानगी दिली आहे, ज्यामुळे मैदानाची दुरवस्था होण्याची शक्यता आहे.
सागर तायडे, अक्षय पवार, लव वामन झाडगे,दीपक सोनवणे, संदिप चव्हाण यांच्यासह अनेक खेळाडूंनी स्वाक्षरी करून दिलेल्या निवेदनात असा इशारा दिला आहे की, जर मैदानावरील आनंद मेळा रद्द करण्यात आला नाही, तर 5 मे 2025 पासून मुख्याधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.

Leave a Reply