भुसावळमध्ये पाकिस्तानचा निषेध: भाजपाच्या वतीने आज पाकिस्तान चा झेंडा पायाखाली तुडवला जाणार

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचे बळी गेल्याने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पाकपुरस्कृत दहशतवादाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने आज दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोर्चात पाकिस्तानचा ध्वज रस्त्यावर टाकून त्याची विटंबना करून तीव्र निषेध करण्यात येणार आहे. कल्पना रसवंतीजवळ हे आंदोलन होणार असून, शहरातील सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, आघाडी संघटनांचे प्रतिनिधी, युवा मोर्चा व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

हा मोर्चा भाजपा शहराध्यक्ष किरण भाऊ कोलते (दक्षिण विभाग), जिल्हा सरचिटणीस परिक्षित भाऊ ब-हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश भाऊ सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल भाऊ जोशी, शहराध्यक्ष (उत्तर विभाग) संदीप भाऊ सुरवाडे, माजी शहराध्यक्ष युवराज भाऊ लोणारी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

जाहिरात👇

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *