आज पिलखेडा, शिंदखेडा जिल्हा धुळे येथे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने श्री हनुमान जयंती निमित्त गुरु गोरक्ष नाथ आखाडा दक्षिणमुखी मारुती पिलखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज 15 एप्रिल रोजी करण्यात आले
होते.
शिबिराचे उद्घाटन रा स्व संघ पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते कार्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, स्वामी असिमानंद जी महाराज, योगी दत्तनाथ महाराज, परमपूज्यने योगी अवधूतनाथ महाराज, आचार्य मानेकर बाबा, शाम चैतन्य महाराज, स्वामी ब्रह्मगिरी महाराज, ह भ प परमेश्वर बाबा महाराज, रमेश गिरी महाराज, शुभ्रानंद जी महाराज, रा.स्व.संघ पश्चिम क्षेत्र कार्यवाह श्री बाळासाहेब चौधरी,आ. अनुपजी अग्रवाल, आ. अमोलदादा जावळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायणजी भाऊसाहेब, जिजाबराव भाऊसाहेब,के पी गिरासे सर, दीपक बागल,डॉ. रितेश पाटील, पंकज कदम, हितेंद्रजी जैन , भाजपा तालुक्याप्रमुख, शिंदखेडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेच्या पूजनानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन श्री बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनही केले
या प्रसंगी विज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम या ठिकाणी घडून आला आहे. शारीरिक आरोग्यासाठी विज्ञान तर मानसिक शांतता आणि आरोग्यासाठी अध्यात्म्याची आवश्यकता आहे. महिला आणि अनेक पेशंट दवाखान्यात जायला टाळत असतात.अशा लोकांसाठी सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा या शिबिरात एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सतत कामात असल्याने मानसिक आरोग्या ची अडचण निर्माण होते. शारीरिक आरोग्य बरोबर मानसिक आरोग्य देखील जपले पाहिजे याबाबत बोलायला सुरुवात केली पाहिजे असेही सांगितले.
सिंधखेडा व आसपासच्या गावातील बहुसंख्य लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. येथे अनेक व्याधींवर तपासणी करून आजाराचे निदान झाल्यानंतर उपचार आणि प्रसंगी शस्त्रक्रियेची देखील व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे.


Leave a Reply