गरुड पुराण हीच माझी प्रेरणा,योगेश पाटीलवासुदेव जेष्ठ नागरिक संघाद्वारे सत्कार

माझ्या वडीलांना देवआज्ञा झाल्यावर घरी गरुड पुराणाचा पाठ करण्यात आला.त्यातील विविध कथा ऐकत असतांना ते दृश्य डोळ्यासमोर सरकत होते. वडिलांचा अंत्यविधी मी मुलगा म्हणुन केला पण ज्यांना कोणी नाही अश्या बेवारस नागरिकांचं मृत्यूनंतर काय? हाच विचार मला प्रेरणा देत गेला आणि मागील तीन वर्षांपासून शहरातील बेवारस मृतदेहाचे अंत्यविधी मी स्वखर्चाने करत आहे. असे प्रतिपादन शासकीय ठेकेदार योगेश पाटील यांनी केले.आज भुसावळ येथील रिंग रोड जवळील रामदेवबाबा योग हॉल येथील वासुदेव जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील,सचिव सतीश जंगले, सहसचिव संजय चौधरी,उपाध्यक्ष भानुदास पाटील आणि मार्गदर्शक धनराज पाटील होते. पुढे योगेश पाटील म्हणाले की,आतापर्यंत 117 बेवारस मृतदेहांचा अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.बेवारस मृतदेह यांची अंत्यविधीची जबाबदारी सोबत आमच्या गो शाळेत 45 गाई आहेत.या गाई आम्ही कसाई यांच्यापासून सुटका करत जमा केल्या आहेत. तसेच कुठल्याही जखमी अवस्थेत असलेल्या गोमाता याचा उपचार देखील आमची टीम करते.

यावेळी लीलाधर पाटील,विश्वनाथ वाणी,सुरेश करंदीकर,रमेश भोगे, भानुदास पाटील, लोटू फिरके,संजीव चौधरी, नरेंद्र महाजन, खुशाल महाजन, यशवंत वारके, विकास राणे,ज्ञानदेव पाटील,तुकाराम पाटील,पांडुरंग पाटील,गणेश सरोदे,दिलीप मराठे, प्रमोद बोरोले, इंदूबाई सपकाळे,लता जंगले, वैशाली पाटील, रजनी राणे, विजया भारंबे, प्रमिला धांडे,रत्ना बोरॉले,भास्कर खाचणे,अशोक नेहेते आदी जेष्ठ नागरिक उपस्थित होते. एप्रिल महिन्यात ज्यांचे वाढदिवस आहेत असे सभासद जेष्ठ नागरिक सुरेश करंदीकर, खुशाल महाजन, लीलाधर पाटील,रवींद्र नारखेडे, वैशाली पाटील यांचे वाढदिवस उपरणे आणि पुष्पहार देत साजरे करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जंगले,प्रस्तावना प्रकाश पाटील तर आभार संजय चौधरी यांनी मांडले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *