१००० वर्षांपूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे पुण्यदर्शन जळगावकरांसाठी आज जळगावमध्ये ऐतिहासिक धार्मिक सोहळा; सामूहिक १.०८ लाख जाप आणि रुद्र पूजा

जळगावकरांसाठी एक ऐतिहासिक व अध्यात्मिक पर्वणी घेऊन येत आहे. १००० वर्षांपूर्वीचे प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंग जळगावमध्ये आज रोजी दर्शनासाठी येणार आहे. हा कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंग जळगाव आणि ओंकारेश्वर मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

आज १,०८,००० ‘ॐ नमः शिवाय’ जाप व रुद्र पूजेचा भव्य धार्मिक सोहळा पार पडणार असून, भक्तांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्वयंसेवकांची जोशात तयारीभक्तांमध्ये प्रचंड उत्सुकता या दिव्य सोहळ्यासाठी अनेक स्वयंसेवक जोरदार तयारीला लागले आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग, मंदिर परिसर, व्यवस्थापन यांनी भक्तांच्या स्वागतासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.संपूर्ण शहरात शिवलिंगाच्या दर्शनाबद्दल प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. स्वयंसेवक घरोघरी जाऊन याबाबत प्रचार प्रसार करत आहेत,प्रत्येक जण “हर हर महादेव” म्हणत या पावन क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे.

वेळ: संध्याकाळी ४ वाजेपासून पुढे

स्थळ: ओंकारेश्वर मंदिर, जळगाव

अधिक माहितीसाठी संपर्क:डॉ. रंजना बोरसे – 9823246246 अर्चना राणे – 9766184641

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *