राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक फाऊंडेशनतर्फे १६ जून रोजी साकरीत महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सव निमित्त शैक्षणिक साहित्य वितरण व पोक्सो कायद्याचे मार्गदर्शन कार्यक्रम

राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाऊंडेशन, भुसावळ यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९८ व्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.या निमित्ताने सोमवार, दि. १६ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजता, साकरी येथील मोठा हनुमान मंदिरात, “अवनी दत्तक योजना” अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे हे बारावे वर्ष आहे आणि हा उपक्रम सलग चौथ्या वर्षी राबवण्यात येत आहे.कार्यक्रमात पोक्सो कायद्याविषयी जनजागृतीसाठी भुसावळ येथील विधीतज्ञ मा. अ‍ॅड. प्रिया अडकमोल यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. विनोद अमृत सोनवणे (सरपंच, साकरी) असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. रोशन अंबादास पाटील (उपसरपंच साकरी ग्रामपंचायत),मा. श्री. रतनसिंग उत्तमसिंग बोदर(पोलीस पाटील साकरी ग्रामपंचायत),मा. श्री. सोपान बळीराम भारंबे (मा. सभापती कृ.उ.बा. समिती, भुसावळ),मा.श्री. सुनिल श्रीधर महाजन(मा.सभापती कृ.उ.बा. समिती, भुसावळ) ,मा.श्री. किरण संतोष चोपडे(सदस्य साकरी ग्रामपंचायत),मा.श्री. जितेंद्र लक्ष्मण चोपडे(सदस्य साकरी ग्रामपंचायत),मा.श्री. नितीन पुंडलिक इंगळे(सदस्य साकरी ग्रामपंचायत),मा.श्री. अश्विन डिगंबर सपकाळे(सदस्य साकरी ग्रामपंचायत),मा. श्री. नारायण झगू कोळी (अध्यक्ष आदिवासी कोळी समाज वधु-वर सुचक महा राज्य),मा. सौ. नंदा भानुदास बाविस्कर(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा. सौ. काजल प्रदिप भारंबे(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा.सौ. निशा विनोद सोनवणे(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा.सौ. सुरेखा रविंद्र भारंबे(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा.सौ. निर्मला सुनिल महाजन(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा.सौ. मालती शरद फालक(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा.सौ. प्रिया संजय चोपडे(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा. श्री. मोहन पुंडलिक पाटील(ग्रामसेवक साकरी ग्रामपंचायत),मा. श्री. संजयसिंग गुलाबसिंग चौधरी(समाजसेवक )व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे संयोजन राजेश्री राजधर सुरवाडे (अध्यक्ष, राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशिय फाऊंडेशन) करणार असून, यशस्वीतेसाठी फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी महिला ,जय बजरंग गृप, साकरी,निर्मला ट्रेनिंग सेंटर,चर्तुभुज मित्र मंडळ,एकता महिला बचत गट सक्रिय योगदान देत आहेत.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *