पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त भुसावळ शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित “युवा संवाद मेळावा” आज साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन भाजप भुसावळ शहर (उत्तर-दक्षिण) विभागातर्फे करण्यात आले होते. शहराध्यक्ष किरणभाऊ कोलते (दक्षिण) व संदीपभाऊ सुरवाडे (उत्तर) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संवादात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
माजी नगराध्यक्ष युवराज भाऊ लोणारी यांनी आपल्या भाषणातून युवकांना समाजातील सकारात्मक बदलासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श घेत युवा पिढीने नेतृत्व आणि समाजसेवेत योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला भाजपचे अनेक मान्यवर पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्च्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संवादात सामाजिक प्रश्न, रोजगार, शिक्षण आणि युवकांसाठीच्या संधी यावर चर्चा झाली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. संवाद, प्रेरणा व राष्ट्रनिर्माणाची दिशा देणारा हा मेळावा युवकांसाठी निश्चितच एक ऊर्जा देणारा ठरला.

Leave a Reply