भुसावळ (प्रतिनिधी):जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या 34 व्या वर्धापन दिन आणि केंद्रीय क्रीडामंत्री तथा खासदार रक्षाताई खडसे यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य 70 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन भुसावळ तालुक्याचे आमदार व महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग मंत्री श्री. संजयजी सावकारे यांच्या हस्ते थाटात पार पडले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, भारतीय जनता पार्टी भुसावळ उत्तर विभाग शहर अध्यक्ष संदीप सुरवाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष संतोष चौधरी यांचा समावेश होता.स्पर्धेत आज गटातील सर्व सामने खेळविण्यात आले असून, उद्या पासून बाद फेरीचे रोमांचक सामने खेळले जाणार आहेत. 11 मे ते 13 मे दरम्यान आयोजित या स्पर्धेत जय मातृभूमी क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व खेळाडू संपूर्ण मेहनत घेत असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त 70 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Leave a Reply