ओम पार्क कॉलनीत ‘श्री श्री योगा सेंटर’ चे उद्घाटन; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग व सत्संगाचे आयोजन

आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ओम पार्क कॉलनी, गजानन महाराज मंदिर येथे ‘श्री श्री योगा सेंटर’ चे भव्य उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र महामृत्युंजय मंत्र पठणाने झाली, त्यानंतर गुरूपूजेचे आयोजन करण्यात आले.

गुरूपूजेनंतर योगाभ्यास सत्र पार पडले, ज्यामध्ये विविध योगासने आणि श्वसन क्रियांचा सराव करण्यात आला. त्यानंतर उपस्थित साधकांसाठी सत्संगाचे आयोजन करण्यात आले. या दिवशी योगाभ्यास व आध्यात्मिक शुद्धतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने योगसाधक उपस्थित होते. श्री श्री योगा सेंटरचे संचालक श्री राजेंद्र राणे यांनी या प्रसंगी उपस्थितांना योगाचे महत्त्व, त्याचे फायदे व दैनंदिन जीवनातील भूमिका यावर प्रभावी मार्गदर्शन केले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *