आंतरराष्ट्रीय योग दिनाचा ११ वा वर्धापनदिन “एक पृथ्वी, एक स्वास्थ्य” या संकल्पनेनुसार भव्य उत्साहात रेल्वे क्रीडांगण, भुसावळ रेल्वे स्थानकासमोर येथे सकाळी ७.०० वाजता साजरा करण्यात आला.
या योग कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमात केंद्र शासन निर्देशित कॉमन योगा प्रोटोकॉलनुसार सामूहिक योगाभ्यास पार पडला. या भव्य कार्यक्रमात केंद्रीय राज्य क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशजी महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आणि भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांच्यासह विविध अधिकारी, रेल्वे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
योगासारखा प्राचीन आणि प्रभावी शारीरिक-मानसिक आरोग्याचा मार्ग जगभर पोहोचवण्यासाठी भारत सरकार आणि स्थानिक प्रशासनाने घेतलेला हा पुढाकार प्रशंसनीय ठरला.


Leave a Reply