निरोगी आणि दिर्घकाळ आयुष्य जगायचे असेल तर प्रत्येकाने
योग्य आहार,योग्य विहार,आणि योग्य विचार ही सुखी आणि समृद्धी आयुष्याची गुरुकिल्ली असून ती आचरणात आणली तर नक्कीच प्रत्येक व्यक्ती आयुष्याची शंभरी पार करू शकेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांनी केले आहे.
ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान तर्फे आयोजित टी. व्ही. पाटील सर यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सव सोहळा दरम्यान ते बोलत होते. ना. सावकारे पुढे म्हणाले की सध्याच्या धावपळीच्या जीवनात जंक फूड खाण्याच्या सवयी वाढल्या आहेत.सोशल मीडियामुळे शारिरीक कसरत कमी होत असून विचारांवर पण बंधन राहिले नाही.त्यामुळे प्रत्येकाचे आयुष्याचे जीवनमान खालावलेला असून आयुष्य पण कमी होत आहे.या नवीन पिढीसमोर ही जुनी पिढी नक्कीच आदर्श असून प्रत्येकाने हा आदर्श समोर ठेवावा.
या अमृत महोत्सवात प्रारंभी सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम वासुदेव पाटील यांची 75 दिव्यांनी ओवाळणी करण्यात आली.यानंतर गूळ तुला करण्यात आली. स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाल्यावर रात्री माऊली भजनी मंडळ तर्फे संगीत संध्या सादर करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील शिक्षक,राजकीय, सामाजिक आणि अध्यात्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी प्रस्तावना प्रकाश पाटील,सूत्रसंचालन सतीश जंगले आणि आभार धनराज पाटील यांनी मानले.
योग्य आहार,योग्य विहार,आणि योग्य विचार उत्तम आयुष्याचे रहस्य… ना.संजय सावकारे

Leave a Reply