रेल्वे सुरक्षा दल (RPF) भुसावळने “ऑपरेशन उपलब्ध” अंतर्गत मोठी कारवाई करत रेल्वे तिकीट दलाली करणाऱ्या एका इसमाला रंगेहाथ पकडले आहे. ही संयुक्त कारवाई उपनिरीक्षक सुदामा यादव, प्रधान आरक्षक नीलेश अढवाल व आरक्षक विलास बोरोले यांनी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूच्या आरक्षण केंद्रावर केली.कारवाईदरम्यान संशयित इसम मो. युसूफ मो. इलियास खाटीक (वय ४४, रा. मिल्लत नगर, भुसावळ) याला पकडण्यात आले. त्याच्याकडे २१ मे २०२५ रोजी जाणाऱ्या १२७१५ DN सचखंड एक्सप्रेसचे PNR नं 453-1626185 असलेले स्लीपर क्लासचे तिकीट मिळाले. या तिकीटाबाबत चौकशी केली असता, त्याने प्रवाशाकडून तिकीटाच्या मूळ किमतीशिवाय ₹२०० अतिरिक्त रोख रक्कम दलाली म्हणून घेतल्याचे कबूल केले.सदर व्यक्तीने कोणताही वैध रेल्वे तिकीट एजंट परवाना सादर केला नाही. त्याच्याविरुद्ध रेल्वे अधिनियम कलम १४३ अंतर्गत गुन्हा क्रमांक २१३१/२०२५ नोंदवण्यात आला आहे. पुढील तपासासाठी प्रकरण उपनिरीक्षक धर्मेंद्र तिवारी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. चौकशीत त्याने आपले guilt मान्य करत, ओळखीच्या मंजूर खान रुकसिन खानसाठी अतिरिक्त दलाली घेऊन तिकीट काढल्याचे कबूल केले.रेल्वे प्रशासनाकडून तिकीट दलालांविरोधात अशाच प्रकारची कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply