आईदादा प्रतिष्ठानच्या सौजन्याने उद्या सन्मान सोहळा; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

“आईदादा प्रतिष्ठान” यांच्या सौजन्याने उद्या रविवार, दिनांक १५ जून २०२५ रोजी “एक क्षण गौरवाचा २०२५” या भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मा.ना. गिरीशभाऊ महाजन, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी मा.ना. संजयभाऊ सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य असतील. विशेष अतिथी म्हणून मा.ना. रक्षाताई खडसे, केंद्रीय क्रीडा मंत्री, भारत सरकार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार असून, समाजातील योगदानाचे कौतुक करण्याचा हेतू या कार्यक्रमामागे आहे.

कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक आहेत राहुल वसंत तायडे (आयोजक – भाजप अनुसूचित जाती मोर्चा, भुसावळ शहर) आणि पदाधिकारी प्रेमचंद तायडे, संतोष ठोकळ, रविंद्र दाभाडे, विक्की गोहर, गणेश जाधव, राकेश सपकाळे, दीपक गायकवाड, नरेश खंडारे, दीपक सोनवणे, दिनेश बालूरे, आकाश आव्हाड, भरत उमरिया, संजय नरवाडे, रवि घुले, वाल्मिक पवार, अश्विन नरवाडे, अजय तायडे यांच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *