जागतिक योग दिनानिमित्त सुशिलाबाई नामदेव फालक प्राथमिक विद्यालय, भुसावळ येथे फालक शाळा, गायत्री परिवार ट्रस्ट व भारत विकास परिषद भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात योगशिक्षक कुणाल महाजन यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व सांगत विविध योगासने आणि श्वसन तंत्र शिकवले. योगाभ्यासाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक आरोग्य कसे वृद्धिंगत होते, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रम प्रसंगी गायत्री परिवार ट्रस्टचे सचिव श्री. किरण फालक, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष श्री. सतीश खडायते, श्री. रमाकांत भालेराव, श्री. गौरव हिंगवे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. हरीश कोल्हे, तसेच परिसरातील नागरिक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
योग दिनानिमित्त उपस्थितांनी सकारात्मक ऊर्जा आणि आरोग्याच्या दिशेने पाऊल टाकत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply