भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. दयाघन एस राणे हे एकतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त झालेत.
सेवापूर्ती समारंभासाठी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य तसेच प्राचार्य फोरम चे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ आर पी फालक होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ शहराचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. श्री रमण भाऊ भोळे तसेच पराग पाटील कार्यालयीन अधिक्षक उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डॉ आर पी फालक, प्रा डॉ संजय चौधरी आणि प्रा डॉ आर बी ढाके यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी मा. रमणभाऊ भोळे आणि प्राचार्य डॉ आर पी फालक यांचे हस्ते प्रा डॉ दयाघन राणे यांचा सपत्नीक सत्कार केला गेला. या वेळी सन्मानवस्त्र उभयतांसाठी सन्मानपूर्वक ड्रेस आणि पैठणी वस्त्र तसेच चांदीची भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करीत असताना प्रा डॉ दयाघन राणे यांनी आपल्या नोकरीच्या एकतीस वर्षांच्या काळात घेतलेल्या अनेक अनुभवांच्या आठवणी सांगितल्या त्या वेळी अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झालेले होते.
आपल्याला मिळालेल्या सहकार्य, आपुलकी, प्रेम आणि पाठबळ या मुळेच आपण अनेक गोष्टी करू शकलो असे मत व्यक्त करीत उपस्थित स्टाफच्या सदस्यांचे तसेच महाविद्यालय व्यवस्थापन तसेच प्रशासनाचे आभार व्यक्त केले. आणि महाविद्यालयाने केव्हाही आवाज द्यावा, मी महाविद्यालयाच्या सेवेसाठी तयार असेल अशी ग्वाही दिली.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना मा. रमण भाऊ भोळे यांनी प्रा डॉ दयाघन राणे करीत असलेल्या व्यसनमुक्तीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. व्यसन ही अत्यंत भयंकर अशी समस्या असून त्या साठी आपल्या महाविद्यालयातून सामाजिक जागृती साठी प्रयत्न होत आहेत ही एक महत्वाची बाब आहे. या सोबतच प्रा राणे यांनी सेवानिवृत्तीनंतर ही आपण महाविद्यालयाच्या सेवेसाठी तत्पर असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आणि इतरांनीही असेच सहकार्य करावे असे आवाहन केले.
अध्यक्षस्थानावरून बोलत असताना प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी प्रा डॉ दयाघन राणे यांनी त्यांच्या सेवा काळात केलेल्या विविध प्रकल्पाबद्दल माहिती दिली तसेच त्यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यामुळे महाविद्यालयाच्या विकासातले योगदान याबद्दल चर्चा केली. प्राचार्य म्हणून काम करीत असताना निर्माण होणारे प्रश्न आणि सहकाऱ्यांशी मित्रत्वाच्या नात्याने वागत असताना महाविद्यालयातील वातावरण प्रगतीसाठी पोषक असते असे मत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी प्रा डॉ अनिल सावळे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना सांगितले की डॉ दयाघन राणे आणि आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत. आणि त्यांच्या कुटुंबियांकडून आम्हा दोघांना सारखेच संस्कार मिळाले म्हणून महाविद्यालयीन सेवा काळात आम्ही सोबतच काम करीत राहिलो.
प्रा डॉ अनिल सावळे यांनी डॉ दयाघन राणे यांच्याबद्दलच्या काही आठवणी या वेळी सादर केल्या. कार्यालयीन कर्मचारी श्री प्रकाश सावळे यांनी मनोगत व्यक्त करीत असताना सांगितले की प्रा डॉ दयाघन राणे हे भौतिक शास्त्र विषय शिकवत असताना सतत काही न काही प्रयोग करीत असत. त्यांच्या प्रयोगशाळेत आल्यावर अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळत असत. आम्हाला त्यातील बऱ्याच गोष्टी कळत नसत, पण राणे सरांशी चर्चा केल्यावर ते अत्यंत सोप्या भाषेत त्या सांगत असत. भौतिक शास्त्राचे प्राध्यापक असले तरी अनेक विषयांचा त्यांना अभ्यास होता तसेच प्रत्येकाला ते अत्यंत आत्मियतेने मदत करत असत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा डॉ माधुरी पाटील यांनी केले तर प्रा डॉ जयश्री सरोदे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी प्रा डॉ दयाघन राणे यांच्या कुटुंबातील सदस्यांसह सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी वर्ग, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते

Leave a Reply