जळगाव ते पंढरपूर मार्गावर चाललेल्या श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात काल गांधी रिसर्च फाउंडेशन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भाविकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
“प्लास्टिकच करूया अंत” या संदेशासोबत, श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांनी भाविकांना पिशव्या वितरित केल्या. शिरसोली येथील मुक्कामस्थळी पार पडलेल्या या उपक्रमात सिंगल यूज प्लास्टिक टाळण्याचा आग्रह करण्यात आला.
ह.भ.प. मंगेश महाराज यांनी सांगितले की, “पर्यावरणाचे रक्षण करत भक्तीचा प्रवास करणे ही खरी सेवा आहे.” अधिकाधिक ठिकाणी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी भाविकांना केले.
कार्यक्रमावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे उदय महाजन, गिरीश कुलकर्णी, मदन लाठी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे करणसिंग राजपूत (प्रादेशिक अधिकारी), राजेंद्र सूर्यवंशी (क्षेत्र अधिकारी) व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply